भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत

अलिबागच्या चिंतन मेळाव्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलीय. भाजपाचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही, तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय. 

Updated: Nov 18, 2014, 12:49 PM IST
भाजपाचे सरकार अस्थिर होऊ देणार नाही - संजय राऊत  title=

मुंबई: अलिबागच्या चिंतन मेळाव्यात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजलीय.राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी त्यासाठी तयारीला लागावं असं विधान शरद पवार यांनी केलंय. तर यावर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आलीय. भाजपाचं सरकार अस्थिर होऊ देणार नाही, तर आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलंय. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पवारांच्या वक्तव्याला उत्तर देत, शिवसेना सत्तेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवलीय. सत्तेच्या चाव्या शिवसेनेच्या हाती असून, विसरू नये शिवसेना मोठा पक्ष आहे, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी शरद पवारांना दिलंय. 

दरम्यान, यामुळं पुन्हा शिवसेना आणि भाजपामध्ये एकत्र येण्याचे संकेत मिळतायेत. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपची दारं शिवसेनेसाठी कायम खुली असल्याचं म्हटलं होतं. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे भाजप-शिवसेना युतीत मध्यस्थी करत असल्याची चर्चा सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.