भाजपला ८५ नगरसेवकांचं पाठबळ, आशिष शेलार यांचा दावा

मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपच्या जवळजवळ समान जागा आल्यामुळं सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू झालाय.

Updated: Feb 23, 2017, 06:35 PM IST
भाजपला ८५ नगरसेवकांचं पाठबळ, आशिष शेलार यांचा दावा title=

मुंबई : मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपच्या जवळजवळ समान जागा आल्यामुळं सत्ता स्थापनेचा संघर्ष सुरू झालाय. २२७ जागांपैकी शिवसेनेला ८४ तर भाजपला ८१ जागा मिळाल्या आहेत. असं असलं तरी भाजपला ८५ नगरसेवकांचं पाठबळ असल्याचा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

त्यामुळे आता दोघं मोठ्या पक्षांची मदार अपक्ष आणि मनसेवर राहणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, सपा आणि एमआयएमचे नगरसेवक अनुपस्थित राहिल्यास बहुमताचा जादुई आकडा 90 पर्यंत खाली येतो. यामुळे आता सत्ता स्थापनेची गणितं कशी जुळतात. सत्तेसाठी शिवसेना भाजप नवा फॉर्म्यूला घेऊन येतात का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.