सेनेला धक्का देण्यासाठी भाजपची व्यूहरचना...

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर-माहीममध्येच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची भाजपची व्यूहरचना आखलीय. 

Updated: Mar 3, 2017, 12:19 PM IST
सेनेला धक्का देण्यासाठी भाजपची व्यूहरचना...  title=

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादर-माहीममध्येच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याची भाजपची व्यूहरचना आखलीय. 

अपक्ष बंडखोर महेश सावंत यांना भाजपमध्ये खेचण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झालेत. सावंत यांना भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदाची ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

सावंत यांना प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 मधे सुमारे साडे आठ हजार इतकी लक्षवेधी मते मिळालीत. त्यांचा शिवसेना आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा अवघ्या 250 मतांनी निसटता पराभव केलाय. 

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दादर-माहीममध्ये भाजपनं ही तयारी केल्याचं म्हटलं जातंय. सावंत यांच्यामागे पक्षाची ताकद लावण्याची भाजपची व्यूहरचना आखलीय. 

यावर, महेश सावंत यांनी मात्र 'वेट अॅन्ड वॉच' धोरण स्वीकारलंय. आपणं अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही... येत्या रविवारी समर्थकांची बैठक, समर्थकांना विचारून योग्य तो निर्णय घेणार असल्याचं महेश सावंत यांनी म्हटलंय. 

उल्लेखनीय म्हणजे, पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत सावंत यांची उद्धव ठाकरे यांनी केलीय शिवसेनेतून हकालपट्टी केली होती.