भाजपचे आशीष शेलार राज ठाकरेंना भेटले

भाजपचे आमदार आणि नेते आशीष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

Updated: Nov 13, 2014, 01:35 PM IST
भाजपचे आशीष शेलार राज ठाकरेंना भेटले title=

मुंबई : भाजपचे आमदार आणि नेते आशीष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

मनसेचे एकमेव नवनियुक्त आमदार शरद सोनवणे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता, तसेच  राज ठाकरे यांनी आपल्याला सरकार पाडा-पाडीत रस नसल्याचं सांगत विश्वासदर्शक ठरावात भाजपला पाठिंबा दिला होता.

या पाठिंब्याबाबत आभार मानण्याच्या निमित्ताने भाजपचे आमदार आशीष शेलार हे राज ठाकरे यांच्या भेटीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हा शिवसेनेला डिवचण्याचा प्रकार आहे का?, असा सवालही राज ठाकरे यांनी केला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.