शिवसेनेला शह देण्यसाठी कोकणवासियांना ओढण्यासाठी भाजपची रणनीती

शिवसेनेने गुजराती लोकांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली असताना दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या संख्येने असेलल्या कोकणवासियांनाही आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. 

Updated: Sep 3, 2016, 08:22 AM IST
शिवसेनेला शह देण्यसाठी कोकणवासियांना ओढण्यासाठी भाजपची रणनीती title=

मुंबई : शिवसेनेने गुजराती लोकांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली असताना दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या संख्येने असेलल्या कोकणवासियांनाही आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. 

मुंबईत आलेला कोकणी चाकरमानी हा खरंतर शिवसेनेचा एकनिष्ठ मतदार. मात्र शिवसेनेकडून ही मतपेटी हिरावून घेण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. याचा एक भाग म्हणून भाजपनं कोकणवासियांचा मेळावाही घेतला. यात कोकणातल्या 4000 गावांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न भाजपा करणार असून 505 गाव प्रमुखांची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजपने उत्तर भारतीयांना गोंजरण्यासाठी चोखा बाटी कार्यक्रमाचेही आयोजन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवादही साधला. आता तर कोकणवासियांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी मेळाव्याचे आयोजन केले. भाजपची कामे लोकांपर्यंत पोहचवणे, समस्या पक्षाकड़े मांडणे, संपर्क राखणे अशा जवाबदाऱ्या देण्यात आल्यात. मुंबईत 20 लाखांपेक्षा जास्त कोकणवासी आहेत.