मुंबई अर्थसंकल्पात वाढ, स्मार्ट सीटीबरोबर सिमेंटचे रस्ते

मुंबईकरांना पालिकेने स्मार्ट सीटीचे स्वप्न दाखविले आहे. त्याचबरोबर शहरात सिमेंटचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तर कराचा बोजा टाकण्याचा इरादा पालिकेने या अर्थसंकल्पात स्पष्ट केलाय. तर पालिकेच्या शाळा हायटेक करण्यासाठी संगणकीय लॅब आणि विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा संकल्प सोडण्यात आलाय. यासाठी गतवर्षीपेक्षा जास्त तरतूद केल्याने अर्थसंकल्पात वाढ झालेली आहे.

Updated: Feb 4, 2015, 08:03 PM IST
मुंबई अर्थसंकल्पात वाढ,  स्मार्ट सीटीबरोबर सिमेंटचे रस्ते title=

मुंबई : मुंबईकरांना पालिकेने स्मार्ट सीटीचे स्वप्न दाखविले आहे. त्याचबरोबर शहरात सिमेंटचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तर कराचा बोजा टाकण्याचा इरादा पालिकेने या अर्थसंकल्पात स्पष्ट केलाय. तर पालिकेच्या शाळा हायटेक करण्यासाठी संगणकीय लॅब आणि विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा संकल्प सोडण्यात आलाय. यासाठी गतवर्षीपेक्षा जास्त तरतूद केल्याने अर्थसंकल्पात वाढ झालेली आहे.

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प बुधवारी मांडण्यात आला. ३३ हजार ५१४ कोटींचा अर्थसंकल्प असून या वर्षी २३३६ कोटी रुपयांची भर टाकण्यात आली आहे. या अर्थसंकल्पासाठी २०० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत.

पिडीत अत्याचारग्रस्त महिलांसाठी ११ दिलासा केंद्र, कोस्टल रुट आणि रुग्णालयात योगा थेरीपी इत्यादी उपक्रम नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. शिक्षणखात्यासाठी २५०१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प असून त्यात व्हर्चुअल क्लासरुम, इंटरनेटद्वारे सर्व शाळांची जोडणी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना आखण्यात आली आहे. 

एमएमआरडीएच्या इमारतींच्या स्वच्छतेकडेही या अर्थसंकल्पात लक्ष देण्यात आले असून झोपडपट्टीवर मालमत्ताकर आकारण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. तर कोस्टल रुट साठी तब्बल २०० कोटींची तरतूद सदर अर्थसंकल्पात आहे. 

तळोजा येथे डंपींग ग्राऊंड उभारण्यात येणार असून त्याकरता राज्यसरकारकडे १२६ हेक्टरची मागणी करण्यात आली आहे. गोरेगाव- मुलुंड लिंकरोडचे बांधकाम आणि संपूर्ण मुंबई शहरात एलइडी लाइट लावण्यात येणार असल्याची तरतूदही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

अर्थसंकल्पात मागील वर्षापेक्षा २७ टक्क्यांनी वाढ करण्यात आली असून ३१ हजार कोटींवरून मुंबई महापालिकेचे 'बजेट' यंदा ३३ हजार ५१४ कोटींपर्यंत गेले आहे.

अर्थसंकल्पात काय?
- डांबरी, सिमेंट क्राँक्रीट ३ हजार २०९ कोटी रस्ते विकास
- सागरी मार्गासाठी २०० कोटींची तरतूद
- मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी विशेष तरतूद
- मुंबईतील सर्व रस्त्यांवर सप्टेंबरपर्यंत एलईडी दिवे 
- पालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्य विमा योजनेसाठी ७५ कोटींची तरतूद
- बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अखंड ज्योतीसाठी ५० लाखांची तरतूद
- कचरा गोळा करण्यासाठी ११४८ स्वयंसेवकांची नियुक्ती
- १ एप्रिलपासून जकात रद्द होण्याची शक्यता
-  इतर कर वाढविण्याबाबत विचार होणार
- आयटीसाठी ७५ कोटींची तरतूद
- राईट टू पी या महिलांसाठी शौचालयांच्या योजनेसाठी ५.२५ कोटी रुपयांची तरतूद 
- पालिका इमारत दुरुस्ती व पुर्नबांधणीसाठी ५६० कोटी रूपये
- स्मशानभूमी सीएनजी कनेक्शनसाठी ४ हजार कोटींची तरतूद
- २०० शाळांमध्ये संगणकीय लॅब
- २९ कोटी रूपये प्राथमिक शिक्षण सुधार कार्यक्रमांतर्गत
- पुढील ५ वर्षात २६ नवीन अग्निशमन केंद्रे बांधण्यासाठी २ कोटींची तरतूद
- अंधेरीत शहाजी राजे क्रीडा संकुलातील प्रस्तावित नाट्यगृहांसाठी २५ लाखांची तरतूद

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.