नवख्या तरुण उमेदवारांने अनुभवी दोन नगरसेवकांना दिला दणका

मुंबई महापालिकेत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कुर्ला विभागातून प्रभाग क्रमांक 160 अपक्ष किरण लांडगे या तरुण उमेवाराचा विजय झाला आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 24, 2017, 01:22 PM IST
नवख्या तरुण उमेदवारांने अनुभवी दोन नगरसेवकांना दिला दणका title=

मुंबई : मुंबई महापालिकेत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कुर्ला विभागातून प्रभाग क्रमांक 160 अपक्ष किरण लांडगे या तरुण उमेवाराचा विजय झाला आहे. 

किरण लांडगे यांच्या विरोधात एकीकडे 15 वर्ष नगरसेविका असलेल्या शिवसेनेच्या अश्विनी मते आणि दुसरीकडे नुकत्याच शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेल्या नगरसेविका लीना शुक्ला यांचा पराभव करत लांडगेंनी हा विजय मिळवला. 

किरण लांडगे यांचे वय अवघे 27 वर्ष आहे. हा विजय विभागातल्या तरुणांचा आणि परिसरातल्या सदस्यांच्या मदतीनेच मिळाल्याचे किरण लांडगे यांनी म्हटले आहे.