कपिलनंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीची नोटीस

कपिल शर्मानंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीने नोटीस पाठवली आहे. अभिनेता इरफान खानला फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. बीएमसीचा आरोप आहे की, इरफानने त्याच्या गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केलं आहे.

Updated: Sep 11, 2016, 04:04 PM IST
कपिलनंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीची नोटीस title=

मुंबई : कपिल शर्मानंतर आणखी एका अभिनेत्याला बीएमसीने नोटीस पाठवली आहे. अभिनेता इरफान खानला फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे. बीएमसीचा आरोप आहे की, इरफानने त्याच्या गोरेगाव येथील फ्लॅटमध्ये अनधिकृत बांधकाम केलं आहे.

२०१४ मध्ये त्यांना याबाबतची तक्रार मिळाली होती. त्यानंतर नो‌टीस पाठवण्यात आली होती. या विरोधात डेव्हलपर सिव्हील कोर्टात गेला होता त्यानंतर इरफानला दिलासा मिळाला होता.

इरफान जेथे राहतो तेथेच कपिल शर्माचा फ्लॅट देखील आहे. या अपार्टमेंटधील अनेकांना पालिकेने नोटीस बजावली आहे.