मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचे सन २०१२- २०१३ साठीचा अर्थसंकल्प महापालिकेसमोर मांडण्यात आला.. २०१२-२०१३ साठीचा अर्थसंकल्प हा २६ हजार 5८१ कोंटीचा होता.. तर यंदाचा अर्थसंकल्प हा २७ हजार 5७८ कोटींचा आहे. सुमारे १ हजार कोटीनं वाढलेल्या या बजेटमध्ये अनेक तरतुदींचा समावेश आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 4, 2013, 06:28 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबई महापालिकेचे सन २०१२- २०१३ साठीचा अर्थसंकल्प महापालिकेसमोर मांडण्यात आला.. २०१२-२०१३ साठीचा अर्थसंकल्प हा २६ हजार 5८१ कोंटीचा होता.. तर यंदाचा अर्थसंकल्प हा २७ हजार 5७८ कोटींचा आहे. सुमारे १ हजार कोटीनं वाढलेल्या या बजेटमध्ये अनेक तरतुदींचा समावेश आहे.
पायाभूत सुविधा
मागील अर्थसंकल्पाचा विचार करता पाणीशुल्काचा मुद्दा प्रचंड गाजला होता. यंदा पाणी आणि मलनिस्सारणासाठी ६४४३.७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. डांबरी, सिमेंट कॉंक्रीटचे रस्ते आणि वाहतूक प्रचलन तसेच पूलांसाठी २, ६5०.७४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.पर्जन्य जलवाहिन्यांसाठी २७१.२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ब्रिमस्टॉवॅडचे प्रकल्प मुंबईत सुरु आहेतच. त्या व्यतिरिक्त नाल्यांच्या कामासाठी ४४३.६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मिठी नदी आणि इतर नद्यांचे रुंदीकरण आणि संरक्षण भिंतीसाठी ४5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आरोग्य
आरोग्यासाठी मागील अर्थसंकल्पात २३४5 कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ करुन २5८.६२ कोटींची तरतूद करण्यात आली. ज्यामध्ये मानसिक ताणतणाव आणि स्वास्थ अशा विषयांवर मुंबईकरांना मार्गदर्शन करणारी २४ तास हेल्पलाईनचा प्रस्ताव आहे.. केईम हॉस्पीटलच्या डायग्नोस्टीक सेवेसाठी २० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.. त्याचप्रमाणे मुंबई विद्यापीठाअंतर्गत आरोग्यशास्त्राचे वैद्यकिय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अभ्य़ासासंदर्भातला प्रस्तावदेखिल महापालिकेच्या विचाराधीन आहे.
अग्निशमन आणि वॉटर टनेल
अग्नीशमन दलासाठी १०६.5१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यात अग्नीशमन गाड्या, अद्यायावत शिड्या. उंच इमारतीवर चढण्यासाठी हायड्रोलीक प्लॅटफॉर्म अशा अनेक गोष्टी नव्यानं प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. आगामी 5 वर्षात २६ अग्निशमन केंद्र सुरु करणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. अनेक वेळा जलवाहिन्या फुटून पाण्याची गळतीचे प्रकार वांरवार समोर येतात. या गोष्टीचा विचार करुन जलवाहिन्या बदलण्यासाठी ११४४.६२ कोटींची तरतूद करण्यात आलीय.. चार नव्या वॉटर टनेलचा प्रस्ताव ही महापालिकेनं मांडलाय.. यासाठी १०६९ कोटींची तरतूद करण्यात आलीय. यामध्ये मलबार हिल ते क्रॉस मैदान , पवई ते वेरावली मैदान, मरोशी ते रुपारेल व्हाया वाकोला आणि गुंदवली ते भांडूप असे चार वॉटर टनेल होणार आहेत.. या सगळ्या प्रोजेक्टची किमंतच ३८९३.४७ कोटी एवढी आहे. त्याचप्रमाणे पुर्व उपनगरांमध्ये चेंबुर ते ट्रॉम्बे आणि चेंबुर ते वडाळा दोन नवीन वॉटर टनेलसाठी ८२.३८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
उद्यान सुशोभिकरण
उद्यानाच्या सुशोभीकरणासाठी विकासाकरता ८२.११ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वीर जीजामाता उद्यानाकरता ७5 कोटींची तरतूद करण्यात आलीय. ज्येष्ठ नागरीकांसाठी मनोरंजन विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार आहेत..

पवई लेक येथे लेसर शोचा नवा प्रस्तावही मांडण्यात आला. दिल्ली हाटच्या धर्तीवर कायम स्वरुपी प्रदर्शन केंद्र सुरु करण्याचाही प्रस्ताव आहे. अनेक योजनांबरोबर मुंबई महापालिकेन शून्य कचरा मोहीम राबवत बॅनर मुक्त मुंबईचाही नारा देण्यात आलाय. प्रशासकीय खर्चासाठी ८८४.5० कोटी तसच आस्थापनासाठी १०१३१.5७ कोटींची तरतूद करण्यात आली...