डॉकयार्ड इमारत दुर्घटना : ४ जणांना ढिगाऱ्यातून काढले, २ गंभीर

By Surendra Gangan | Last Updated: Friday, September 27, 2013 - 10:11

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतल्या डॉकयार्ड स्टेशन परिसरात सकाळी पावणेसहाच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. इमारत ढिगाऱ्याखालून ४ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बीएमसी कॉलनीतल्या बाबूगेनू मंडईजवळील ही रहिवासी इमारत आहे. या इमारतीमध्ये जवळपास २२ कुटुंब राहत होती. दुर्घटनेतून आत्तापर्यंत ४ जण जखमी झालेत. तर जवळपास ५० जण ढिगा-याखाली अडकलेले असण्याची शक्यता आहे. ही मार्केट डिपार्टमेंटची इमारत आहे. अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. १२ फायर इंजिन, ४ ऍम्ब्युलन्स, २ रेस्क्यू व्हॅन्स बचावकार्य करत आहेत. चार जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. चार जखमींना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात एका लहानग्याचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
मुंबई महानगरपालिकेतल्या कर्मचा-यांच्या वसाहतीमधील ही इमारत कोसळली आणि संपूर्ण परीसर सुन्न झाला. या दुर्घाटनाग्रस्त इमारतीत २२ कुटुंब वास्तव्याला होती. दुर्घटनेचं वृत्त समजताच नातेवाईक, शेजारी आणि मित्र मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. इमारतीमधील रहिवाशांची सुखरुप सुटका व्हावी यासाठी प्रत्येकजण धडपडत आहेत.
स्थानिक शिवसेना नगरसेविका यामिनी जाधव यांनी प्रशासनावर याचं खापर फोडले आहे. सव्वा वर्षांपूर्वी प्रशासनाला आणून या इमारतीची गंभीर स्थिती दाखवली होती, तरीही प्रशासनानं दिरंगाई केली, असा आरोप त्यांनी केला आहे. तर प्रशासनाच्या दिरंगाईमुळेच ही दुर्घटना घडल्याचं माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, September 27, 2013 - 10:07
comments powered by Disqus