मुंबईत भररस्त्यात व्यापाऱ्याचा खून

शहरातील अंधेरीच्या गिलबर्ट रोडवर वर्दळीच्यावेळी रस्त्यात एका व्यापाऱ्याचा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Updated: Feb 4, 2016, 12:33 PM IST
मुंबईत भररस्त्यात व्यापाऱ्याचा खून title=

मुंबई : शहरातील अंधेरीच्या गिलबर्ट रोडवर वर्दळीच्यावेळी रस्त्यात एका व्यापाऱ्याचा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण हल्ल्याचा थरार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

व्यापारी रामू धोत्रे यांचा खून करण्यात आला. धोत्रे यांचा ट्रान्पोर्टचा व्यवसाय आहे. धोत्रे पायी जात असताना त्यांना रस्त्यात तिघांनी अडविले. त्यांनी धोत्रे यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केलेत. त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी त्यांचा भाऊ धाऊन आला. मात्र, आरोपींनी त्याच्यावरही वार केले. हा हल्ला झाला त्यावेळी रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती. 

हल्ल्याच्यावेळी काही स्थानिकांनी दोघांना पकडले. त्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. तर यातील एक हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरला. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रामू यांना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे तिथे निधन झाले. पोलिसांनी दोघा आरोपींची कसून चौकशी सुरु केलेय.