कॅम्पाकोलाचं उपोषणास्त्र : उपोषणाचा पाचवा दिवस

वरळीच्या कँपाकोला कंपाऊंडमधल्या रहिवाश्यांनी आपली घरं वाचवण्यासाठी उपोषणाचं अस्त्र उगारलंय. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 8, 2013, 01:10 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वरळी
वरळीच्या कॅम्पाकोला कंपाऊंडमधल्या रहिवाश्यांनी आपली घरं वाचवण्यासाठी उपोषणाचं अस्त्र उगारलंय. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
सुप्रीम कोर्टानं दिलेली ११ नोव्हेंबरची मुदत संपण्यास आता केवळ तीन दिवस उरलेत. सोमवारी संपत असून महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई करेल. कारवाईसाठी अवघे काही दिवस उरलेले असतानाही कॅम्पाकोलाच्या रहिवाशांचा निर्धार आणि आशा कायम आहे. दरम्यान, उपोषणावर असलेल्या एकाची प्रकृती ढासळल्यानं या रहिवाशाला हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलंय.

महत्त्वाचं म्हणजे वाढता राजकीय हस्तक्षेप आणि रहिवाशांच्या उपोषणानंतरही कॅम्पाकोलाचे बेकायदा बांधकाम पडण्यावर पालिका ठाम आहे.कलम ४८८ अंतर्गत नोटीस देण्यापासून या कारवाईला सुरुवात होणार आहे.

दरम्यान उपोषणाच्या चौथ्या दिवशी राज्यमंत्री मिलिंद देवरा, मनसे गटनेते बाळा नांदगावकर, ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.