अंधेरीत कारने पाच जणांना उडवलं

By Surendra Gangan | Last Updated: Monday, February 18, 2013 - 09:56

www.24taas.com,मुंबई
मुंबईत हिट अँड रनची ही काही पहिलीच घटना नाही.. याआधीही अशा भरधाव वेगाची झिंग पाहायला मिळालीय. मुंबईत भरधाव वेग आणि बेदरकारपणे गाडी चालवणं अनेकांच्या जीवावर बेतलंय.मुंबईतली अंधेरीत हिट एन्ड रनचं प्रकरण समोर आलयं. अंधेरीत एका आलिशान मर्सिडिज कारनं पाच जणांना उडवलयं.
पाचही जण जखमी झालेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येतय. रात्री अंधेरी पश्चिममध्ये ही घटना घडलीये. पाच जणांना उडवणारा कार चालक फरार झालाय.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलयं. पोलीस फरार कारचालकाचा शोध घेतायेत.

याआधी १२ फेब्रुवारीला वांद्र्यात होंडा अकॉर्ड गाडीनं पाच जणांना दिलेल्या धडकेत दोघांचा बळी गेला होता.. बेदरकारपणे गाडी चालवून निरपराधांचा बळी जाण्याच्या अशा घटना मुंबई आणि अन्य शहरांमध्ये घडत आहेत. त्यामुळं अशा बेलगाम वेगाला लगाम घालणार कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय.

First Published: Monday, February 18, 2013 - 08:27
comments powered by Disqus