सीबीआय दाभोलकरांच्या हत्येच्या चौकशीस तयार

डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करण्यास सीबीआय तयार आहे. सीबीआयने यावर मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.

Updated: Apr 23, 2014, 04:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी करण्यास सीबीआय तयार आहे. सीबीआयने यावर मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.
केतन तिरोडकर यांनी याविषयी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. यानंतर सीबीआयने ही चौकशीची तयारी दर्शवली आहे.
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात हत्या करण्यात आली होती. मात्र अनेक महिने उलटूनही दाभोलकरांचे मारेकरी अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत.
नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात 21 ऑगस्ट 2013 रोजी हत्या करण्यात आली होती. डॉ.नरेंद्र दाभोळकर हे अंधश्रद्धेविरोधात लढा देत होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.