शेतकरी जळतायत, 'सीसीआय'चे अधिकारी खुळखुळा वाजवतायत

( जयवंत पाटील, झी २४ तास ) देशभरात कापसाचं उत्पन्न घटलंय, एकरी १० क्विंटल पिकवला जाणारा कापूस ३ ते ५ क्विंटलवर येऊन थांबलाय. दुसरीकडे व्हियतनाम सारख्या देशाला ५ लाख टन गाठी हव्या आहेत. मात्र कापसाच्या मार्केटिंगवर कुणाचंही गंभीरपणे लक्ष नसल्याचं दिसतंय.

Updated: Oct 15, 2015, 07:15 PM IST
शेतकरी जळतायत, 'सीसीआय'चे अधिकारी खुळखुळा वाजवतायत title=

मुंबई : ( जयवंत पाटील, झी २४ तास ) देशभरात कापसाचं उत्पन्न घटलंय, एकरी १० क्विंटल पिकवला जाणारा कापूस ३ ते ५ क्विंटलवर येऊन थांबलाय. दुसरीकडे व्हियतनाम सारख्या देशाला ५ लाख टन गाठी हव्या आहेत. मात्र कापसाच्या मार्केटिंगवर कुणाचंही गंभीरपणे लक्ष नसल्याचं दिसतंय.

सीसीआयचे अधिकारी खुळखुळा वाजवतायत
मात्र कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी संस्था शेतकऱ्यांना जागतिक स्तरावर आणि देशांतर्गत कापसाला भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करते, त्या संस्थेचे अधिकारीच शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळत असल्याचा कांगावा करीत आहेत.

सीसीआय शेतकऱ्यांच्या काय कामाची
यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे की, सीसीआय ही संस्था शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित काम करत नाही, कापसाच्या नावावर सरकारने पांढरा हत्ती पोसण्यासारखी सीसीआय ही संस्था आहे.

दुष्काळामुळे कापसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलंय
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशात दुष्काळामुळे कापसाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटलंय, यामुळे कापसाची वाणवा बाजारात आहे. नवरात्रीनंतर कापसाच्या जीन नियमित सुरू झाल्यावर कापसाचा मोठा तुटवडा समोर येणार आहे. त्यानंतर कापसाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

पंजाबमध्ये कंपन्यांनी बनावट किटकनाशकं दिली?
पंजाबमध्ये बनावट किटकनाशक कंपन्यांनी शेतकऱ्यांना पुरवल्याने, पांढऱ्या माशीचा मोठा हल्ला कापूस पिकांवर झाला आहे, शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण पंजाबमध्ये वाढलंय. या घोटाळ्यात काही कृषी अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे झाले आहेत.

बनावट किटक नाशकं वापरल्याने पंजाबमध्ये ५० टक्क्यांच्यावर तर हिमाचलमध्ये ४० टक्के कापसाचं उत्पन्न घटलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.