CCTV फुटेज : गॅलरीच्या वादातून तुंबळ हाणामारी!

बुधवारी रात्री मुंबईतल्या साकी नाका परिसरात एका रहिवासी सोसायटीच्या सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय. 

Updated: Jan 8, 2016, 10:46 AM IST

मुंबई : बुधवारी रात्री मुंबईतल्या साकी नाका परिसरात एका रहिवासी सोसायटीच्या सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झालीय. 

वरच्या मजल्यावरची गॅलरी चार फुटानं वाढवण्याच्या कारणावरून घर मालकाचा मुलगा आणि इतर सदस्यांमध्ये वाद झाला. त्याचंच रुपांतर पुढे हाणामारीत झालं. ही सगळी हाणामारी सीसीटिव्हीत कैद झाली. 

ज्या घराच्या गॅलरीचं काम सुरू आहे, त्या घराच्या मालकाच्या मुलानं सोसायटीच्या सदस्यांवर आधी हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय. दिलाशाद कुंजू असं वादग्रस्त घरात राहणाऱ्या इसमाचं नावं आहे. 

वादावादीचं स्वरुप इतकं गंभीर होतं, की दिलाशाद कुंजूने सोसायटीतच राहाणाऱ्या अमोल शिंदेच्या डोक्यात लोखंडी सळईनं वार केलेत. अमोल शिंदे गंभीर जखमी असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात दाखल आहे. याप्रकरणी वादग्रस्त घरात राहणाऱ्या दिलाशद कुंजू याला अटक करण्यात आलीय.