मध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार

मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय. त्यामुळं मध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार आहेत.

Updated: Jan 25, 2016, 12:19 PM IST
मध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार  title=

मुंबई : मध्य रेल्वेचे नवीन वेळापत्रक उद्यापासून अंमलात येतंय. त्यामुळं मध्य रेल्वेवर लोकलच्या ४१ फे-या वाढणार आहेत.

नव्या वेळापत्रकानुसार ट्रान्स हार्बर मार्गावर २२, हार्बर मार्गावर ७ आणि मुख्य मार्गावर १२ फे-या वाढवण्यात येणार आहेत. यामध्ये १६ फे-यांचा विस्तार करण्यात आलाय. 

हार्बर मार्गावरील गाड्या बेलापूरऐवजी पनवेल, वडाळा ऐवजी सीएसटी स्थानकापर्यंत तर ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल नेरुळ, बेलापूर ऐवजी पनवेल स्थानकापर्यंत चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील फे-यांची संख्या ५८३ वरून ५९० होणार आहे. 

तर ट्रान्स हार्बर मार्गावरील फे-या २१० वरून २३२ वर पोहोचणार आहे. लोकलच्या फे-यांमध्ये वाढ होणार असल्यानं गर्दीला वैतागलेल्या प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळणार आहे..