मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, गाड्या २० ते ३० मिनिटे उशिराने

मध्य रेल्वे मार्गावरील विघ्न काहीकेल्या दूर होण्याची चिन्ह नाहीत. आज सकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना २० ते ३० मिनिटे उशिराने प्रवास करावा लागला.

Updated: Sep 9, 2014, 10:39 AM IST
मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत, गाड्या  २० ते ३० मिनिटे उशिराने title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील विघ्न काहीकेल्या दूर होण्याची चिन्ह नाहीत. आज सकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांना २० ते ३० मिनिटे उशिराने प्रवास करावा लागला.

दिवा स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. रुळ दुरूस्त झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. मात्र लोकल अद्यापही २०-२५ मिनिटे उशिराने धावत आहेत. 

मोठा फटका मध्य रेल्वेवरील जलद मार्गावरील वाहतुकीला बसला. त्यामुळे मुंबईकरांना रेल्वे स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले. सकाळी कार्यालयात जाण्यासाठी अनेकांना उशीर झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.