मध्य रेल्वे आता सुपरफास्ट

सीएसटी ते ठाणे मार्गावर शनिवारी मध्य रेल्वेने घेतलेली डीसी-एसी चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे आता मध्य रेल्वेच्या गाड्यांचा वेग वाढणार असून, वीजबचतही होणार आहे, असा दावा मध्य रेल्वने केलाय.

Updated: Dec 22, 2014, 09:16 AM IST
मध्य रेल्वे आता सुपरफास्ट title=

मुंबई : सीएसटी ते ठाणे मार्गावर शनिवारी मध्य रेल्वेने घेतलेली डीसी-एसी चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे आता मध्य रेल्वेच्या गाड्यांचा वेग वाढणार असून, वीजबचतही होणार आहे, असा दावा मध्य रेल्वने केलाय.

सीएसटी ते ठाणे अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि सीएसटी ते मुंब्रा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर डीसी ते एसी परावर्तनाची चाचणी मध्य रेल्वने २० डिसेंबरच्या रात्री घेतली होती.

आता रेल्वे सुरक्षा आयुक्तांना त्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सुरक्षा आयुक्त याची पाहणी करतील. सध्या ठाण्यापर्यंत १,५०० डीसीवर लोकल धावत आहेत. यामुळे २५,००० एसीवर गाड्या धावतील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.