मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. दिवा आणि मुंब्रा दरम्यान रूळाला तडे गेल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय. 

Updated: Sep 3, 2014, 12:41 PM IST
मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत title=

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा विस्कळीत झाली आहे. दिवा आणि मुंब्रा दरम्यान रूळाला तडे गेल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतोय. 

स्लो-अपची वाहतूक अप फास्टवर टाकण्यात आली आहे, सीएसटीकडे येणाऱ्या गाड्य़ा 20 मिनिटे उशीराने धावतायत.

हार्बर रेल्वेचीही रडारड
हार्बर रेल्वेची वाहतूकही 10-15 मिनिटं उशीराने सुरू आहे. हार्बरवर मानुखर्द ते वाशी दरम्यान रूळाला तडा गेला होता, ही घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास लक्षात आल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.