बाळासाहेबांच्या भेटीसाठी छगन भुजबळ मातोश्रीवर....

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बाधंकाममंत्री छगन भुजबळ हे मातोश्रीवर पोहोचले आहेत.

Updated: Nov 1, 2012, 06:11 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी बाधंकाममंत्री छगन भुजबळ हे मातोश्रीवर पोहोचले आहेत. बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भुजबळ मातोश्रीवर नुकतेच दाखल झाल्याचे समजते. दसरा मेळाव्यानंतर बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळेच आज छगन भुजबळ हे बाळासाहेबांना भेटण्यासाठी गेले आहेत. छगन भुजबळ आणि बाळासाहेब यांच्यातील द्वंद्व हे साऱ्य़ानांच चांगले माहित आहेत. मात्र बाळासाहेबांच्या प्रकृतीबाबत समजताच छगन भुजबळ ह्यांनी मातोश्रीवर बाळासाहेबांची भेट घेतली.
तर आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेबांची भेट घेतली.राज ठाकरेंबरोबर त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. महिनाभरात राज ठाकरे तिस-यांदा बाळासाहेबांच्या भेटीला गेले होते. दोघांनीही बाळासाहेबांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊतही मातोश्रीवर येऊन गेले.