'पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी'वर बोलले भुजबळ

छगन भुजबळ यांनी आपल्या व्हॉटसअॅपवर पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी लावला होता. हा डीपी त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना अटक झाली होती, तेव्हाच लावल्याने चर्चेला उधाण आलं होतं, यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांच्या पाठिशी पक्ष उभा असल्याचे संकेत दिले होते.

Updated: Feb 9, 2016, 08:08 PM IST
'पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी'वर बोलले भुजबळ title=

मुंबई : छगन भुजबळ यांनी आपल्या व्हॉटसअॅपवर पाठीत खंजीर खुपसण्याचा डीपी लावला होता. हा डीपी त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना अटक झाली होती, तेव्हाच लावल्याने चर्चेला उधाण आलं होतं, यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भुजबळांच्या पाठिशी पक्ष उभा असल्याचे संकेत दिले होते.

यावेळी छगन भुजबळ हे अमेरिकेत होते, तेव्हा भुजबळांनी असा फोटो का ठेवला, असं त्यांना विचारल्यावर भुजबळांनी उत्तर दिलंय, "पत्रकारांनी याचा चुकीचा अर्थ काढू नये, व्हॉटसअॅपवर अनेक फोटो येतात, त्यापैकी हा फोटो आवडल्याने लावला, काही जवळच्या व्यक्तींशी दुरावाही झाला, पण पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नाही".