हा फोटो भुजबळांचाच आहे का?

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ज्यांचा राजकारणात प्रवेश एक शिवसैनिक म्हणून झाला.

Updated: Apr 24, 2016, 11:02 PM IST
हा फोटो भुजबळांचाच आहे का? title=

मुंबई : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, ज्यांचा राजकारणात प्रवेश एक शिवसैनिक म्हणून झाला, नंतर शिवसेनेचे पहिले महापौर होण्याचा मान ज्यांनी मिळवला होता, तसेच वेळोवेळी ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप सोडली, ते छगन भुजबळ मात्र आज अडचणीत आहेत, कारण ते आज भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरूंगात दिवस काढतायत.

राजकारणाचा रंग कोणता?

नेहमीच वेगवेगळे कलरफुल मफलर, आणि डोक्याचे केस डाय केलेले भुजबळ सर्व महाराष्ट्राने पाहिले आहेत. मात्र सध्या एक फोटो व्हॉटसअॅपवर फिरतोय, तो छगन भुजबळ यांचाच आहे, यावर अजुनही कुणाचा विश्वास बसत नाहीय, म्हणून हा फोटो खरा किंवा खोटा यावर व्हॉटसअॅपवर चर्चा रंगलीय.

राजकारणाच्या सुखात सर्वच साथी...

व्हॉटसअॅपवर जो फोटो व्हायरल होतोय. या सोबत भुजबळ हे सेंट जॉर्ज रूग्णालयात मधुमेह, रक्तदाब आणि दम्याच्या रूटीन चेकअपसाठी आले होते, त्या दरम्यान भुजबळांना डुलकी आली, डुलकीचा फायदा घेत, एकाने हा फोटो क्लिक केल्याचं सांगण्यात येतंय. ही अवस्था पाहून राजकारणातले चांगले चांगले दिग्गज हादरले आहेत.

मात्र या फोटोतील व्यक्तीची अवस्था पाहून कुणालाही विश्वास होत नाहीय, की हा फोटो भुजबळांचाच आहे का?... हा फोटो भुजबळांचाच आहे किंवा नाही, याविषयी आम्ही कोणतीही पुष्टी करत नाहीत.