भुजबळ ‘शॅडो-डेप्युटी सीएम’?

By Shubhangi Palve | Last Updated: Thursday, October 4, 2012 - 16:03

www.24taas.com, मुंबई
उपमुख्यमंत्रिपदाचा राजिनामा दिलेल्या अजित पवारांच्या अनुपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचं नेतृत्व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांनी आपल्याकडे घेतलं. अजित पवारांची खुर्ची आता भुजबळांनी काबीज केलीय. अर्थात, राष्ट्रवादीकडून अशा प्रकारची कुठलीही घोषणा करण्यात आली नसली, तरी भुजबळ आता ‘शॅडो-डेप्युटी सीएम’ म्हणून काम करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या शेजारी असलेल्या खुर्चीत कोण बसणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं होतं. या खुर्चीमध्ये आत्तापर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार बसत होते. बैठकीला सुरुवात होताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आपल्या नेहमीच्या जागी आसनस्थ झाले. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूची (अजित पवारांची) खुर्ची आपल्या ताब्यात घेतली अन् आता छगन भुजबळ हेच ‘शॅडो-डेप्युटी सीएम’ म्हणून काम पाहणार असल्याचं स्पष्ट झालं.
अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री पदावर कुणीही बसणार नसल्याचं राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठी शरद पवारांनी म्हटलं होतं.First Published: Thursday, October 4, 2012 - 16:03


comments powered by Disqus