मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, शिंदेंचे नाव आघाडीवर

वाढती नाराजी लक्षात घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचारी सुरु केल्या आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पायउतार होवे लागण्याची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 18, 2014, 03:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वाढती नाराजी लक्षात घेऊन काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचारी सुरु केल्या आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना पायउतार होवे लागण्याची शक्यता आहे.
पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या हालचालींना दिल्लीत वेग आलाय. विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी नव्या नावाची घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. त्याशिवाय महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीही नावे स्पर्धेत आहेत.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेस पक्षांतर्गत नाराजी प्रचंड वाढलीय, त्यामुळं पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला वेग आलाय.आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच, काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.