मुंबई मनपात मनसेच्या गटनेतृत्वात बदल

By Jaywant Patil | Last Updated: Monday, October 7, 2013 - 18:24

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई महापालिकेत मनसेनं नेतृत्वबदल केलाय. दिलीप लांडेंना मनसेनं गटनेतेपदावरुन हटवलंय. त्यांच्या जागेवर संदीप देशपांडेंची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आलीय.
मनसेनं ज्येष्ठतेचा निकष लावत दिलीप लांडेंना गटनेतपद दिलं होतं. पण डॉकयार्ड बिल्डिंग दुर्घटना प्रकरणासह विविध मुद्द्यांवर लांडेंकडून अपेक्षित आक्रमकता सभागृहात दिसली नाही. त्याचबरोबर ते नगरसेवकांना शिस्त लावण्यातही कमी पडल्याचं बोललं जातंय.
एकंदरीतच लांडेंची कामगिरी फारशी प्रभाव पाडणारी नसल्यानं त्यांना गटनेतेपदावरुन हटवण्यात आलंय. त्यांच्याजागी चाणाक्ष नगरसेवक अशी ओळख असलेल्या संदीप देशपांडे यांना आता मनसेचं गटनेतेपद देण्यात आलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013 - 18:24
comments powered by Disqus