मी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होणार नाही - अजित पवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीबाबत बिघाडी होण्याचे संकेत अधिक गडद झाले आहे. दोन्ही पक्षामधील वाद विकोपाला जाताना दिसत आहे. पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार नाही, असे स्फोटक विधान अजित पवार यांनी केलेय.

Updated: Sep 18, 2014, 11:00 PM IST
मी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री होणार नाही - अजित पवार title=

मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात आघाडीबाबत बिघाडी होण्याचे संकेत अधिक गडद झाले आहे. दोन्ही पक्षामधील वाद विकोपाला जाताना दिसत आहे. पृथ्वीराज चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री झाले तर मी पुन्हा उपमुख्यमंत्री होणार नाही, असे स्फोटक विधान अजित पवार यांनी केलेय.

अजित पवार यांच्या विधानानंतर दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी न होण्याबाबतचे संकेत मिळत आहेत. स्वबळावर लढण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. काँग्रेसने निम्म्या जागा दिल्या तर विचार करु असा इशारा राष्ट्रवादीने दिला होता. मात्र, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी युती होणार असे म्हटले होते. त्यानंतर अजित पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री चव्हाण यांना टार्गेट केल्याने वेगळीच गणिते मांडण्यात येत आहेत.

दरम्यान, काँग्रेसकडून अजित पवार यांच्या विधानाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अजित पवार असं काहीतरी बोलतात आणि त्यांच्यावर आत्मक्लेश करण्याची वेळ येते, अशी खोचक प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.