मुख्यमंत्री चव्हाण यांचा राजकीय फटाका, शरद पवारांवर कोटी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा दस्तुरखुद्द शरद पवारांनी केली आहे. परंतु शरद पवारांना निवडणूक लढवण्यास भाग पाडू, असे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 2, 2013, 01:06 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा दस्तुरखुद्द शरद पवारांनी केली आहे. परंतु शरद पवारांना निवडणूक लढवण्यास भाग पाडू, असे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
पवार हे ज्येष्ठ राजकारणी आहेत. स्वत:च्या पक्षाच्या भूमिकेबाबत काय निर्णय घ्यायचा हा सर्वस्वी त्यांचा प्रश्नत आहे. काँग्रेसपासून त्यांनी घेतलेली भूमिका हा सध्या चर्चेचा विषय असला तरी ते जे बोलतात ते कधीच फायनल नसते, असे फटाके मुख्यमंत्री चव्हाण यांनी फोडले. दिवाळीनिमित्ताने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील राजकारण तसेच प्रश्नां चा मागोवा घेतला.
‘आपण यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असे पवार म्हणतात, पण त्याचवेळी कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आपल्याला निवडणूक लढवावी लागली, माझा नाइलाज होता, असेही म्हणायला ते तयार असतात. आताही तसे होऊ शकते. त्यामुळे या विषयावर आत्ताच बोलण्याची गरज वाटत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लोकसभेच्या जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी काँग्रेसवर झोड उठविली होती. यावर मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही जागा मागण्यासाठी काँग्रेसच्या दारात गेलेलो नाही हे जाधवांचे म्हणणे खरे आहे. कुणी कुणाच्या दारात जाण्याचा प्रश्नच येत नाही. प्रत्येक पक्षाला आपली ताकद वाढवण्याचा हक्क असतो, मात्र देशपातळीवरील निवडणुकांचा विचार केला तर मतभेद विसरून सर्वांना एकत्र यावे लागेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.