‘भाई कोई हलवा नही, जो किसी के भी हात आए`

‘भाई कोई हलवा नही, जो किसी के भी हात आए’... दाऊदविषयी हे उदगार आहेत छोटा शकीलचे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 26, 2013, 10:30 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई (डीएनए)
‘भाई कोई हलवा नही, जो किसी के भी हात आए’... दाऊदविषयी हे उदगार आहेत छोटा शकीलचे...
अब्दुल करीम टुंडा आणि यासीन भटकळला भारताने अटक केल्यावर दाऊदचं काय? अशा स्वरूपाचे प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सतत येत होते. यासिन आणि टुंडाच्या माध्यमातून दाऊदपर्यंत पोहोचता येतं का? याबाबतचीही माहिती घेतली जात होती. यामुळे छोटा शकीलने हे वक्तव्य केलंय.
भारत आणि अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थाही दाऊदला ताब्यात घेण्यासाठी एकत्रित कारवाई करत असल्याचं ९ सप्टेंबरला सुशील कुमार शिंदे म्हणाले होते. त्यावर छोटा शकीलने हे उदगार काढलेत. बॉस म्हणजेच ‘दाऊद हलवा नाही, जो कोणाच्याही हाती येईल, किंवा बॉलिवूड फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे त्याला निष्क्रीयही करता येणार नाही’ असं त्यानं डीएनएशी बातचीत करताना म्हटलंय.

काय आहे दाऊदचा ठावठिकाणा पाहूया...
दाऊद आत्तापर्यंत खुलेआम कराचीतराहात होता, तो सहकाऱ्यांनाही भेटत होता, मात्र आता तो कोणालाही भेटत नाही, दुबई, मुंबईशी त्याच्या व्हीडीओ काँन्फरन्सही आता होत नाहीत. वायव्य पाकिस्तानात त्याला हलवलंय. तो आता फक्त सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून उपलब्ध असतो, असंही त्यानं म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.