राजकारणातला सच्चा माणूस गेला! - मुख्यमंत्री

आर.आर.पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलंय, "एक अत्यंत संवदेनशील नेता, राजकारणातला एक सच्चा माणूस, एक उत्कृष्ट संसदपटू आमच्यातून गेला "

Updated: Feb 16, 2015, 05:44 PM IST
राजकारणातला सच्चा माणूस गेला! - मुख्यमंत्री title=

मुंबई : आर.आर.पाटील यांच्या निधनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटलंय, "एक अत्यंत संवदेनशील नेता, राजकारणातला एक सच्चा माणूस, एक उत्कृष्ट संसदपटू आमच्यातून गेला "

महाराष्ट्राच्या लोकांना मोठा धक्का
तसेच "आमच्या करता दु:खाचा क्षण आहे, महाराष्ट्राच्या लोकांना मोठा धक्का आहे, आर आर पाटलांनी अजून लोकशाहीची सेवा केली असती, सामान्य जनतेशी ज्याची नाळ जोडली गेली होती, जो सामान्यांचाच विचार करणारा नेता होता".

आबांवर शाकयी इतमामात अंत्यसंस्कार
"शासकीय इतमामात आर आर पाटलांवर अंत्यसंस्कार होतील, एक दिवसाचा दुखवटा मी घोषित करतो, महाराष्ट्रावर हा आघात असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

हजर जबाबी नेता
दरम्यान, "महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा हजर जबाबी नेता मी पाहिला नाही. एखाद्या गोष्टीमागचं आर आर पाटील यांचं तत्वज्ञान तेवढाच महत्वाचं असायचं", असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.