विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांचा रामबाण उपाय

Last Updated: Sunday, March 19, 2017 - 23:28
विरोधकांच्या गोंधळावर मुख्यमंत्र्यांचा रामबाण उपाय

मुंबई : अर्थसंकल्प मांडताना विधीमंडळात विरोधक गोंधळ घालणार याची पूर्ण कल्पना असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष काळजी घेतली होती. म्हणूनच अभूतपूर्व गोंधळातही अर्थमंत्र्यांना विधानसभेत आणि अर्थ राज्यमंत्र्यांना विधान परिषदेत अर्थसंकल्प व्यवस्थित मांडता आला. याला कारण होतं ते महत्त्वाच्या आणि मोजक्या मंत्र्यांना पुरवण्यात आलेले खास हेडफोन.

आजुबाजुच्या गोंधळाचा आवाज ऐकू येणार नाही असे अत्यंत चांगल्या दर्जाचे हे हेडफोन होते. तसंच विरोधक सभागृहात गोंधळ घालत फलक फडकवणार हे लक्षात घेऊनच अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्रीच सतत कॅमेरावर दिसत रहातील अशी व्यवस्थाही करण्यात आली होती. त्यामुळे सभागृहाच्या वेलमध्ये विरोधक उतरले. त्यांनी फलक फडकवले तरीही अर्थसंकल्प मांडत असलेल्या मंत्र्यांचाच चेहरा तेवढा प्रेक्षकांना टीव्हीवर दिसत राहिला. 

 

First Published: Sunday, March 19, 2017 - 23:28
comments powered by Disqus