पाहा राज्यात कुठे कुठे वाढलीय थंडी

विदर्भातही पारा दिवसेंदिवस खाली घसरतोय. नागपुरात 7.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 27, 2016, 12:54 PM IST
पाहा राज्यात कुठे कुठे वाढलीय थंडी title=

मुंबई : राज्यात थंडीचा कडाका जाणवत आहे. ठिकठिकाणी पारा घसरतोय. निफाडमध्ये 6.4 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आलीय. तर नाशिकमध्ये पाका 8 अंशावर आहे. तर इकडे मराठवड्यातही थंडीचा कडाका आहे. परभणीचं तापमान 8.5 अंशावर आलंय. 

विदर्भातही पारा दिवसेंदिवस खाली घसरतोय. नागपुरात 7.7 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आलीय.  वर्षअखेरीला राज्यात सर्वदूर थंडीची लाट पसरलीय. त्यामुळं सकाळच्या वेळी शेकोट्या स्वेटर, मफलर, शालींचा आधार घेताना सारेच जण दिसत आहेत.