महाराष्ट्र... थंडाथंडा कूल कूल

राज्यात आता ख-या अर्थाने थंडीचा मोसम सुरू झालायं, कारणही तसंच आहे म्हणा..

Updated: Dec 23, 2015, 08:24 PM IST
महाराष्ट्र... थंडाथंडा कूल कूल  title=

मुंबई : राज्यात आता ख-या अर्थाने थंडीचा मोसम सुरू झालायं, कारणही तसंच आहे म्हणा..स्वेटर्स, कानटोप्या, घोंगड्या, ब्लँकेट्सची आता राज्यासह मुंबईकरांनाही गरज भासू लागली आहे.. 

राज्यापासून काहीसा दूर असलेला हिवाळा अखेर आता चांगलाच जोर धरताना दिसतोय. नाशिक, पुणे, मराठवाड्यासह मुंबईतही गेल्या दोन दिवसात पारा चांगलाच घसरलाय. नाशिकामध्ये मंगळवारी रात्री पारा साडे सहा अशांवर पोहचला. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तर पारा आणखी खाली गेलाय. निफाडमध्ये काल रात्री तापमान 6 अंश सेल्शियस होतं.  तिकडे पुण्यातही पारा 9.8 अंशापर्यंत पोहचलाय. तर मुंबईचं तापमान 11.6 अंशापर्यंत पोहचलंय. महाबळेश्वरपेत्रा मुंबईला थंडीचा कडाका अधिक जाणवतोय. महाबळेश्वरचं सध्याचं तापमान हे 14 अंश आहे.