मुंबई डॉकयार्ड इमारत दुर्घटनेत ३१ जणांचा बळी

मुंबईत डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत ३१ जणांचा बळी गेलाय. तर ३० जण जखमी आहेत. तर अजून सुमारे २७ जण बेपत्ता आहेत. आज एकाला जिवंत बाहेर काढण्यास जवानांना यश आलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 28, 2013, 03:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत ३१ जणांचा बळी गेलाय. तर ३० जण जखमी आहेत. तर अजून सुमारे २७ जण बेपत्ता आहेत. आज एकाला जिवंत बाहेर काढण्यास जवानांना यश आलंय.
ही महापालिकेचीच इमारत होती. घटनास्थळी अजून बचावकार्य सुरू आहे. डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेत ३१जणांचा बळी गेलाय. मात्र, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरूच आहे. अजूनही या ढिगा-याखाली २७पेक्षा जास्त जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
या दुर्घटनेप्रकरणी तळमजल्यावर असलेल्या डेकोरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृतांच्या वारसांना एक लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आलीय. तर उपचारांचा सगळा खर्च महापालिका करणार आहे. बचावकार्यादरम्यान एका सहा वर्षांच्या चिमुरड्यालाही यशस्वीरित्या बाहेर काढण्यात यश आलं. फायरब्रिगेडचे आणि एनडीआरएफचे जवान युद्धपातळीवर बचावाचे कार्य करत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.