चालत्या रेल्वेत महिलेचा विनयभंग, आरोपीला अटक!

चालत्या ट्रेनमध्ये एका महिलेची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला ही व्यवसायाने एक डॉक्टर आहे...

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 14, 2013, 02:44 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चालत्या ट्रेनमध्ये एका महिलेची छेडछाड करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिला ही व्यवसायाने एक डॉक्टर आहे तर छेडछाड करणारा व्यक्ती हा एक वरिष्ठ सीबीआय अधिकाऱ्याचा सीनिअर स्टेनो आहे. त्याचं नाव चंद्रप्रकाश मलखान सिंग असं आहे.
गुजरातहून मुंबईला येणाऱ्या ट्रेनमध्ये ही घटना घडलीय. अँटॉप हिल इथं राहणारी ही महिला गुजरात मेल मधून अहमदाबाद ते मुंबई प्रवास करत होती. दरम्यान, सूरतमध्ये हा तरुण गाडीत चढला. त्यानं गाडीतच या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेनं प्रसंगावधान राखून टीसीकडे तक्रार केली. टीसीनं याबाबतची सर्व माहिती रेल्वे हेल्पलाईनला दिली.

ट्रेन बोरिवलीला दाखल झाल्यावर मुंबई सेंट्रल पोलिसांनी (जीआरपी) आरोपीला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. दादरमध्ये त्याला अटक करण्यात आली.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी चंद्रप्रकाश सिंग हा सीबीआय अधिकारी असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु, सिंग हा स्वत: सीबीआय अधिकारी नसून तो नवी मुंबईत कार्यरत असलेल्या सीबीआयच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याचा सीनिअर स्टेनो म्हणून काम पाहत असल्याचं उघड झालंय.
सदरची घटना वलसाडच्या हद्दीत झालेली आहे. त्यामुळे आरोपीला वलसाड पोलिसांकडे सोपवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी दिलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.