मुंबईत कॉरस्पॉन्डेन्ट बैंकिंग सुरु

मुंबईत कॉरस्पॉन्डेन्ट बैंकिंग सेवा सुरु करण्यात आला आहे. आघाडीच्या शेड्युल्ड नागरी सहकारी बँकांमध्ये पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा समावेश होतो. सध्या महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये बँकेची सेवा आहे.

Updated: Oct 31, 2014, 11:11 AM IST
मुंबईत कॉरस्पॉन्डेन्ट बैंकिंग सुरु  title=

मुंबई : मुंबईत कॉरस्पॉन्डेन्ट बैंकिंग सेवा सुरु करण्यात आला आहे. आघाडीच्या शेड्युल्ड नागरी सहकारी बँकांमध्ये पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा समावेश होतो. सध्या महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि गोवा या राज्यांमध्ये बँकेची सेवा आहे.

देशातील पहिल्या १० सहकारी बँकांमध्ये या बँकेची गणना होते. या बँकेच्यावतीने मुंबईत कॉरस्पॉन्डेन्ट बैंकिंग सुरु करण्यात आलंय. यामुळे ग्राहकांना त्यांच्या घराजवळ बँक नसतानाही बँकेचे प्राथमिक व्यवहार करता येणार आहेत. 

त्याचप्रमाणे बँकेने व्यावसायिकांसाठी बिझनेस क्रेडीट कार्ड ही बाजारात आणले आहे. बँकेच्या १०१ शाखा सुरु झाल्याच्या निमित्ताने मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बँकेने या सेवांचे उद्घाटन केले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.