महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमिवर अनुयायांची गर्दी

आज आज ६ डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्ताने दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकर अनुयायांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातून नागरिक चैत्यभूमिवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत.  दरवर्षीप्रमाणे आजही दादर परीसरात मोठी गर्दी झाली आहे.

Updated: Dec 6, 2016, 12:50 PM IST
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमिवर अनुयायांची गर्दी  title=

मुंबई : आज आज ६ डिसेंबर म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यानिमित्ताने दादरच्या चैत्यभूमी परिसरात आंबेडकर अनुयायांसाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यभरातून नागरिक चैत्यभूमिवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी येत आहेत.  दरवर्षीप्रमाणे आजही दादर परीसरात मोठी गर्दी झाली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, विनोद तावडे, राजकुमार बडोले, नरेंद्र जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडरांना अभिवादन केलं.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.