दाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले

डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. 

Updated: Jan 20, 2017, 02:12 PM IST
दाभोलकर, पानसरे हत्येप्रकरणी सीबीआयला उच्च न्यायालयाने फटकारले title=

मुंबई : डॉ नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयला आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले. 

याप्रकरणात तपासातील हायकोर्टाला विचारल्याशिवाय कुठलीही माहिती सार्वजनिक करू नका असा निर्देश आज हायकोर्टानं दिला. याप्रकरणी आज सीबीआयनं नवा चौकशी अहवाल सादर केला. त्यानंतर हायकोर्टानं हे ताशेरे ओढले.

दरम्यान स्कॉटलंड यार्डनं तपासात सहकार्य करण्यास नकार दिल्याचं सीबीआयनं कोर्टात स्पष्ट केलंय. दरम्यान आज हायकोर्टाच्या बाहेर अंनिस आणि इतर समविचारी संघटनांनी सीबीआयच्या संथ तपासाविरोधात निदर्शनं केली.

दाभोलकरांच्या हत्येला आज तब्बल 41 महिने पूर्ण होत आहेत. अजूनही आरोपींना शिक्षा झालेली नाही. ज्यांना पकडले आहे, त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करण्यात सीबीआय आणि इतर तपास यंत्रणा कमालीची दिरंगाई करत असल्याचा दाभोलकर समर्थकांचा आरोप होता.