दादरमध्ये शाखाप्रमुख घराणेशाहीला कंटाळे, अपक्ष लढणार

 दादरमध्ये शिवसेनेत सुरू असलेल्या घराणेशाहीला कंटाळून माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांनी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केलीय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 4, 2017, 12:07 AM IST
 दादरमध्ये शाखाप्रमुख घराणेशाहीला कंटाळे, अपक्ष लढणार  title=

मुंबई :  दादरमध्ये शिवसेनेत सुरू असलेल्या घराणेशाहीला कंटाळून माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांनी अपक्ष अर्ज भरण्याची तयारी केलीय. 

समाधान सदा सरवणकर यांच्या विरोधात महेश सावंत निवडणुक लढविणार आहे. एकाच घरात विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक उमेदवारी शिवसेनेने दिलीय. 

त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं सांगत त्यांनी अपक्ष अर्ज दाखल करण्याची तयारी केलीय. समाधान एवजी कोणताही उमेदवार द्यावा असं त्यांनी यावेळी सांगितलं....