मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणे धोकादायक, चोरीच्या उद्देशाने एकाला भोसकले

मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणंही आता धोकादायक झालंय. मुंबईत माहिम रेल्वेस्थानकावर झोपलेल्या एका तरूणावर चोरीच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला कऱण्यात आला. ज्यात तो तरूण जखमी झालाय. रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवत आरोपींना काही तासातच बेड्या ठोकल्या. 

Updated: Aug 23, 2016, 09:54 PM IST
मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणे धोकादायक, चोरीच्या उद्देशाने एकाला भोसकले title=

मुंबई : मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबणंही आता धोकादायक झालंय. मुंबईत माहिम रेल्वेस्थानकावर झोपलेल्या एका तरूणावर चोरीच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला कऱण्यात आला. ज्यात तो तरूण जखमी झालाय. रेल्वे पोलिसांनी सतर्कता दाखवत आरोपींना काही तासातच बेड्या ठोकल्या. 

22 ऑगस्ट. माहीमच्या रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर अरविंद कुमार नावाचा 19 वर्षांचा तरूण झोपला होता. अरविंद हा सुरतवरून मुंबईत नोकरीसाठी आला होता. मालाड इथे त्याने कामासाठी भेटही दिली. सुरतला परतण्यासाठी तो माहीम स्थानकावर उभा होता. पण सूरतला जाणारी गाडी उशीरा असल्याचं कळल्याने तो प्लॅटफॉर्मवरच झोपला. आणि इथेच त्याने आपला जीव धोक्यात टातला.

अरविंदने उशाशी त्याची बॅग घेतली होती. ती चोरण्याचा एका चोराने प्रयत्न सुरू केला. अरविंदला जाग आली. त्याने चोराचा पाठलाग केला. पण थोड्याच अंतरावर रेल्वे ट्रॅकवर असलेल्या त्या चोराच्या साथीदारांनी अरविंदला मारहाण करण्यासा सुरूवात केली. अरविंदही या चोरांचा प्रतिकार करत होता. पण त्या पाच जणांपैकी एकाने अरविंदच्या पोटात सुरा भोसकला. पण तशाच जखमी अवस्थेत अरविंद पुन्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर आला. 

अरविंदला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसांनी सीसीटीव्ही पोलीस तपासून खब-यांकडून माहिती घेत दोन तासांत या 5 चोरट्यांना अटक केली. तीन वर्षांपूर्वी रेल्वे ट्रॅकलगत असलेल्या शक्ती मिल कंपाऊंडमध्ये अशाच नराधकमांनी एका महिला पत्रकारावर सामूहिक बलात्कार केला होता. तेव्हा रेल्वे पोलीस आणि मुंबई पोलिसांनी चोरांचा, गर्दुल्ल्यांचा, गुंडांचा बंदोबस्त केल्याचा दावा केला होता. तो दावा या प्रकारामुळे फोल ठरल्याचे स्पष्ट होत आहे.