डॉनला हादरा, दाऊदची मालमत्तेचा होणार लिलाव

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हादरा बसणार आहे. दाऊदच्या मालमत्तेवर लिलावाने टाच येण्याची शक्यता आहे. 

Updated: Dec 1, 2015, 05:46 PM IST
डॉनला हादरा, दाऊदची मालमत्तेचा होणार लिलाव title=

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हादरा बसणार आहे. दाऊदच्या मालमत्तेवर लिलावाने टाच येण्याची शक्यता आहे. 

नागपाड्यातल्या दिल्ली जायका हॉटेलचा समावेश आहे. याखेरीज महावीर बिल्डिंगमधला एक फ्लॅट आणि हयुंदाई असेंट कारचाही लिलाव होणार आहे. 

स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेशन अँक्ट आणि नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रोपिक सबस्टन्सेस अॅक्टनुसार ही कारवाई होणार आहे. १९९३ साली झालेल्या मुंबई साखळी स्फोटांनंतर दाऊदच्या अनेक बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आल्यात. 

पाहा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.