डॉक्टरांच्या संपात लहानग्याचा मृत्यू

निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केलेल्या संपामुळे एका लहानग्याला आपला जीव गमवावा लागला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 29, 2013, 12:01 AM IST

www.24taas.com, मुंबई
निवासी डॉक्टरांनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी केलेल्या संपामुळे एका लहानग्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ऋत्विक जाधव या लहानग्यावर उपचार करण्यासाठी त्याचे आई वडील केईएम, नायर आणि जेजे या हॉस्पिटल्समध्ये फेऱ्या घालत होते. मात्र ऋत्विकचा मृत्यू झाला.
नायगाव येथील ऋत्विक जाधव याला गेल्या आठ महिन्यांपासून जंतूसंसर्गाची समस्या होती. २४ एप्रिलपासून तो अस्वस्थ वाटत होतं. त्याच्यावर त्वरित उपचार व्हावेत यासाठी त्याचे आई वडील केईएम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मात्र येथे उपचार होणार नाहीत, असं त्यांना सांगण्यात आलं.यानंतर जेजे मध्ये ऋत्विकवर उपचार व्हावेत म्हणून तेथे घेऊन गेले मात्र तिथेही २५ रुपये भरा, मगच नेब्युलायजर लावू असं नर्सने म्हटलं.

सर्व हॉस्पिटल्समध्ये संपामुळे उपचार होणं अशक्य झालं होतं. अखेर नायर हॉस्पिटलला हालवल्यावर डॉक्टरांनी ऋत्विकला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेर ऋत्विकची प्राणज्योत मालवली.