<B> <font color=red> व्हिडिओ :</font></b> तिकीटासाठी `देढफुट्या`च्या खांद्यावर मनसेचा झेंडा!

‘आम आदमी पार्टी’ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळं मुंबईतल्या सिने इंडस्ट्रीतल्या स्टार मंडळींच्या आशाही पल्लवित झाल्यात. इतक्या की अनेकांना सिनेमासोबत राजकारणाच्या मोठ्या पडद्यावर करिअर साकारण्याचं स्वप्न पडू लागलंय. त्यातलाच एक आहे... संजय नार्वेकर.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 9, 2013, 10:38 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘आम आदमी पार्टी’ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामुळं मुंबईतल्या सिने इंडस्ट्रीतल्या स्टार मंडळींच्या आशाही पल्लवित झाल्यात. इतक्या की अनेकांना सिनेमासोबत राजकारणाच्या मोठ्या पडद्यावर करिअर साकारण्याचं स्वप्न पडू लागलंय. त्यातलाच एक आहे... संजय नार्वेकर.
संजय नार्वेकर... मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरचा हरहुन्नरी कलाकार... अभिनयाप्रमाणेच आता त्याला राजकीय क्षेत्रात नशीब आजमावण्याचे वेध लागलेत. मनसेच्या तिकिटावर आगामी निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत वास्तवमधल्या या ‘देढफुट्या’ने दिलेत… आणि त्याला तसं वाटत असेल तर बिघडलं कुठे?.. दिल्लीमध्ये केजरीवालांच्या ‘आम आदमी पार्टी’नं अगदी सामान्यातल्या सामान्य लोकांना उमेदवारी दिली, त्यापैंकी अनेक जण निवडूनही आले. त्यामुळं अनेकांना आशेचे किरण दिसू लागलेत. जे अरविंद केजरीवालांना जमलं ते आपल्याला का नाही जमणार? असं अनेकांना वाटतंय. त्यातूनच आता राजकीय जागरुकता वाढीस लागतेय. निकालांना चोवीस तासही उलटत नाहीत तोवर ती खुलेपणानं व्यक्तही होऊ लागलीय.
परंतु अजूनही काठावर बसून पाण्यातल्या तरंगांचा अंदाज घेणारेही कमी नाहीत. महागुरू सचिन पिळगावकर हे देखील त्यातलेच. राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगण्यात काहीच गैर नाही. दाक्षिणात्य राज्यांमध्ये एन.टी. रामाराव, जयललिता, चिरंजीवी यांसारख्या पडद्यावरील कलाकारांनी राजकारणात चांगलाच ठसा उमटवलाय. मात्र, त्याचवेळी आपला आदेश भावोजी बांदेकर होणार नाही, याचीही काळजी राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या मराठी कलाकारांनी घ्यायला हवी.

व्हिडिओ पाहा -

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.