मुंबईत डेंग्यूचा प्रसार

मुंबईत आत्तापर्यंत डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झालाय. आणि आता मालवणी भागातील आमदार अस्लम शेख यांचं कुटुंबच डेंग्यूचं शिकार बनलं असल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 23, 2012, 09:03 PM IST

www.24taas.com, मुंबई
मुंबईत आत्तापर्यंत डेंग्यूमुळे पाच जणांचा मृत्यू झालाय. आणि आता मालवणी भागातील आमदार अस्लम शेख यांचं कुटुंबच डेंग्यूचं शिकार बनलं असल्याचं उघड झालंय. त्यामुळे परिसरात घबराटीचं वातावरण आहे.
मालाड मालवणीमध्ये सध्या डेंग्यूनं चांगलंच थैमान घातलंय. डिसेंबरच्या दुस-या आठवड्यात मालवणीमध्ये आठ वर्षांच्या मुलीचा आणि तिच्या वडिलांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे मुंबईत डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 झाली आहे. आता तर चक्क मालवणीच्या आमदाराच्या घरातच डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. आमदार अस्लम शेख यांचं कुटुंबच डेंग्यूचं शिकार बनलंय. अस्लम शेख यांच्या वहिनी खतिजा शेख आणि पुतण्या नईम शेख यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. डेंग्यू आणि साथीच्या आजारानं घातलेल्या थैमानाला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युती आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप आमदार अस्लम शेख यांनी केलाए.
मालवणी भागात याआधी जाफरी कुटुंबाला डेंग्यूची लागण होऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता. अस्लम शेख राहत असलेल्या मालवणी, मार्वे रोड गेट नंबर एकच्या इमारतीत राहणा-या इकबाल कुरेशीलाही डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे मालवणी परिसरात डेग्यूच्या वाढत्या विळख्यानं रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळेच डेग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लवकरात लवकरत उपाययोजना करण्याची गरज आहे...