राज ठाकरेंच्या भेटीला देवेंद्र फडवणीस, चर्चेला उधाण

Last Updated: Wednesday, June 5, 2013 - 12:33

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला कृष्णकुंजवर दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस राज यांच्या भेटीला गेल्यानं राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे.
कृष्णकुंजवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचे समजते. दिल्लीच्या धरतीवर महाराष्ट्रात लोकशाही आघाडी स्थापन करण्यासाठी राज ठाकरेंच्या भेटीला फडवणीस गेल्याचे समजते. राज ठाकरे आता कोणाला टाळी देणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर राजकीय हालचालींना मात्र वेग आला आहे. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालंय. आता विशाल महायुतीच्या चर्चांनाही ऊत येणार हे निश्चित...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.



First Published: Wednesday, June 5, 2013 - 12:26


comments powered by Disqus