राज ठाकरेंची सदिच्छा भेट – धनंजय मुंडे

मी बरेच दिवस भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज भेटीनंतर भाजप खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आज दिली. त्याचवेळी त्यांनी हात जोडून पत्रकारांना सांगितले निवडणुकीचा या भेटीत मुद्दा नव्हता.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 29, 2013, 10:12 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
मी बरेच दिवस भेटलो नव्हतो. ही केवळ सदिच्छा भेट होती, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज भेटीनंतर भाजप खासदार गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी आज दिली. त्याचवेळी त्यांनी हात जोडून पत्रकारांना सांगितले निवडणुकीचा या भेटीत मुद्दा नव्हता.
राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन धनंजय मुंडे भेट घेतली. बीड जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच मुंडे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, ही निवडणुकीसाठीची भेट नव्हती, अशी माहिती राष्ट्रवादीचे उमेदावर धनंजय मुंडे यांनी दिली.
धनंजय मुंडे हे वडील पंडित अण्णा मुंडे यांच्यासह काही महिन्यांपूर्वी भाजपला रामराम करून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात घेतले. त्यांनी नुकताच या जागेसाठी राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्जही भरला आहे. त्यामुळे कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून धनंजय मुंडे यांनी मोर्चे बांधणी सुरू केली. त्यासाठीच ते कृष्णकुंजवर गेल्याचे म्हटले जात होते. मात्र, ही राजकीय भेट नव्हती तर ती सदिच्छा भेट होती, असे ते म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.