विधान परिषदेत मुंडे विरूद्ध मुंडे

206 कोटींच्या चिक्की घोटाळ्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला घेरलं. मात्र सर्वांचं लक्ष आकर्षित केलं ते मुंडे विरुद्ध मुंडेंच्या रंगलेल्या सामन्यानं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिक्की खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

Updated: Jul 30, 2015, 11:42 PM IST
विधान परिषदेत मुंडे विरूद्ध मुंडे title=

मुंबई : 206 कोटींच्या चिक्की घोटाळ्यावरून विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला घेरलं. मात्र सर्वांचं लक्ष आकर्षित केलं ते मुंडे विरुद्ध मुंडेंच्या रंगलेल्या सामन्यानं. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी चिक्की खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.

 या घोटाळ्याची हायकोर्टाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी धनंजय मुंडेंची केलीय. तर आपणच मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचं सांगितल्याचा दावा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी केला.

तसंच धनंजय मुंडेंच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलं. मात्र मुंडे विरुद्ध मुंडेंच्या या सामन्यात विरोधकांनी मोठा गोंधळ घातल्यानं काही काळ विधान परिषदेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी केली पंकजा मुंडेंची पाठराखण

मुख्यमंत्र्यांनी पंकजा मुंडेची पाठराखण करत चौकशीतून काहीही निष्पन्न न झाल्याचं स्पष्ट केलं. तसंच खोदा पहाड निकला चुहा.. अशा शेलक्या शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिक्की प्रकरणी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला...

तसंच गेल्या पंधरा वर्षांच्या खरेदीची चौकशी करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत केली.

चिक्की मागचं गणित

राज्यात सध्या चिक्की घोटाळा गाजत आहे.. 10 दिवसांत 10 लाख किलो चिक्की तयार करणं शक्य आहे का यावर आम्ही या विषयातल्या व्यावसायिकांची मतं मागवली. लोणावळ्याच्या सुप्रसिद्ध मगनलाल चिक्कीचे मालक ध्रूव अगरवाल यांच्या मते एका शिफ्टमध्ये 2200 कुशल कारागीर असतील तर 12 दिवसांत 26 लाख किलो चिक्की करणं शक्य आहे.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.