धनगर आरक्षणाचा प्रस्ताव पाठविला नसल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली : पवार

धनगर आरक्षणाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल गौप्यस्पोट केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण प्रस्ताव केंद्राकडे पाठविला नसल्याची कबुली दिली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भेटीनंतर दिली.

Updated: Jun 2, 2015, 01:54 PM IST
धनगर आरक्षणाचा प्रस्ताव पाठविला नसल्याची मुख्यमंत्र्यांची कबुली : पवार title=

मुंबई : धनगर आरक्षणाबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल गौप्यस्पोट केल्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण प्रस्ताव केंद्राकडे पाठविला नसल्याची कबुली दिली, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी भेटीनंतर दिली.

आपण प्रस्तावर पाठविला नसला तरी धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे. आता या विषयावरून कोणतेही राजकारण करण्यात येऊ नये, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य नेते उपस्थित होते. 

केंद्रीय आदिवासी विकासमंत्री जोएल ओरम यांनी शरद पवार यांना पाठविलेल्या पत्रात राज्य सरकारने यासंबंधीचा प्रस्ताव पाठविला नसल्याचे म्हटले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारवर टीका केली होती. सत्तेवर आल्यानंतर १५ दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आता ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी दिलेले शब्द पाळावेत, असा चिमटा शरद पवार यांनी यापूर्वी काढला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.