ढोबळे गॉन..पार्टी ऑन!

By Jaywant Patil | Last Updated: Sunday, September 16, 2012 - 22:38

www.24taas.com, मुंबई
कधी काळी मुंबईत `भागो..ढोबले आया` असं म्हटलं जायचं तर आता `ढोबले गॉन..पार्टी ऑन` अशी चर्चा सुरु झालीय. कारण, वसंत ढोबळे यांची समाजसेवा शाखेतून बदली करण्यात आली आहे..वसंत ढोबळे आता वाकोला डिवीजनचे एसीपी बनवण्यात आले आहेत.
वसंत ढोबळे..मुंबई पोलीस दलाचा एक असा अधिकारी ज्याचा नावानेच काळे धंदे करणाऱ्यांची झोप उडायची.. कायदाभंग करत उशीर रात्रीपर्यंत पार्टी करणा-या तरूण `भागो ढोबले आया ` म्हणत क्लब मधून पळ काढत सुटायचे...
मात्र समाजसेवा शाखेतील या अधिका-याची बदली करण्यात आलीय...गेल्या दोन वर्षात तब्बल 500 हून जास्त ठिकाणी छापा टाकून ढोबळे यांनी मुंबईत अवैध धंदे चालवणा-यांची कंबर मोडली होती. ढोबळेंची धाड फक्त डांस बार, मटका, वेश्या व्यवसाय इथंच थांबली नाही.. उच्चभ्रू वर्गातील कायदा मोडणा-यांच्या मनात ढोबळेंच्या कारवाईमुळं धडकी निर्माण झाली होती. मुंबईकरांची नाईट लाईफ बंद करण्याचा आरोपही ढोबळेंवर झाला. त्यामुळं ढोबळे हटाओ मोहिमही राबवण्यात आली.. मात्र ढोबळेंनी सुरु केलेल्या या कारवाईला तत्कालीन पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांचाही पाठिंबा मिळाला...त्यामुळं ढोबळे झुकले नाही किंवा थांबले नाहीत... आयुक्तांच्या विश्वास त्यांनी खरा करुन दाखवला...
मात्र आता पटनायक यांची बदली झाल्यानंतर काही दिवसांतच ढोबळे यांचीही बदली करण्यात आलीय... त्यांना आता वाकोला डिवीजनचा सहाय्यक पोलीस आयुक्त बनवण्यात आलं आहे.. त्यांच्या बदलीमुळं नाईट पार्टी करणा-या तरूणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.. ढोबळे यांच्या बदलीमुळे समाजसेवा शाखेवर आता जबाबदारी वाढलीय.. मात्र गेल्या दोन वर्षात ढोबळे यांनी निर्माण केलेला दरारा कायम राहणार आणि दुसरा दबंग ढोबळे कोण बनणार हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे...

First Published: Sunday, September 16, 2012 - 22:38
comments powered by Disqus