पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प होता कामा नये - मुख्यमंत्री

पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प झाली नाही पाहीजे अशी सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला केली आहे. आज राज्याच्या मान्सून पूर्व तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतला.

Updated: May 19, 2016, 10:26 PM IST
पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प होता कामा नये -  मुख्यमंत्री title=

मुंबई : पावसाळ्यात लोकल सेवा ठप्प झाली नाही पाहीजे अशी सक्त सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेला केली आहे. आज राज्याच्या मान्सून पूर्व तयारीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृहात घेतला.

मुंबईतील लोकल सेवा बंद पडू नये यासाठी रेल्वेने योग्य नियोजन करावं अशी खरमरीत सूचना वजा आदेशच यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित रेल्वे अधिका-यांना दिला. गेल्या वर्षी मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली होती, लोकल सेवाही बंद पडली होती. ती परिस्थिती इतकी बिघडली होती की स्वत: मुख्यमंत्र्यांनी मुंबई पालिकेच्या आपत्कालीन कक्षात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.